Home » Life Learnings » Incidental » सर्कशीतला पहेलवान शिकवून गेला हसण्याचे महत्त्व !!!

सर्कशीतला पहेलवान शिकवून गेला हसण्याचे महत्त्व !!!

Advertisements

यंदाच्या  वर्षी एप्रिल २०१६ला आमच्या सोनूताईचा डोहाळ जेवणाचाकार्यक्रम होता, त्या साठीमी आमच्या गावीगेलो होतो (गुऱ्हाळ, निलंगा , लातूर). त्या वेळी  कार्यक्रमाचीसर्व तयारी झाल्यानंतर, आम्ही सर्व जणअसच गप्पा गोष्टीकरत बसलो होतो. तेवढ्यात एक वर्दीऐकण्यास आली किआज रातच्याला गावातबीड चे नानापहेलवान सर्कस सादर करणारआहेत, तरी सर्वगावकर्यांनी रात्री आठच्या नंतरमारुतीच्या पारा समोरहजर राहून सर्कशीचामानसोक्त आनंद घ्यावाअशी नम्र विनंती.

मी त्या वेळीत्याच्या कडे दुर्लक्षकेल आणि माझ्याकामां मध्ये गुंगझालो आणि रात्रकधी झाली काहीसमजलेच नाही. तसे माझेचुलते मला म्हणालेचल राहूल तुलागावची सर्कस दाखवतो. त्या वेळी माझ्यामनात विचार आलाकि आता यांनाकाय सांगू मीखूप मोठ्या मोठ्यासर्कस बघून बसलोयत्याच्या समोर हिकाही नाही, पणत्यांच्या  मान ठेवण्यासाठी मी म्हणालो चला काका. तस गावातल मारुतीच मंदिर आमच्या घरापासून जास्तीत जास्त ५० पाऊल दुर असेल. तिथे पोहोचल्यावर बघितले की गावची लहान मोठी सर्वच मंडळी तिथे जमली होती, त्या गर्दी मध्ये थोडी जागा बघून मी आणि काका एका भिंतीच्या आडोश्याला थांबलो. मी चोफेर नजर फिरवून बघितले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची आतुरता स्पष्ट दिसत होती. त्या गर्दीच्या मध्यभागी पहेलवानांनी त्याच्या खेळासाठी माती वगेरे टाकून जागा केली होती. तिथेच बाजूला त्याचा तंबू होता त्यात त्याने खेळाची सर्व अवजारे ठेवली होती. पहेलवाना सोबत एक आजोबा आणि एक लहान ८ ते १० वर्षाचा मुलगा होता. त्याला ते हायब्रीड पहेलवान म्हणत होते. त्यांच्या खेळला गावातला ढोलकी वाला साथ देत होता.

त्या वेळी पहेलवाना कडे बघून काही प्रश्न मला पडला की, गावाकडच्या लोकांन मध्ये येऊन अश्या प्रकारे फक्त लंगोट मध्ये अशे खेळ करून दाखवायला जिगर लागतो जिगर, आहो गावी जाताना मी देखील माझ्या कपड्यांचा सेट वेगळा ठेवला आहे, कारण जर काही फैशनेबल कपडे घालून गावी गेलो तर गावकरी वाकून वाकून बघतात त्या क्षणी अशे वाटते कि जसे काही आपण परग्रहीच आहोत आणि अश्या ठिकाणी तो खेळ करतो तो ही अंगावर एक कपडा घेऊन व हसत खेळत खरच त्या गड्याला मनाचा मुजरा.
पुढच्या दोन तासात पेह्लावानाने भरपूर खेळ करून दाखवले. जसा कि लांब उड्या, उंच उड्या, जळत्या रिंग मधून उडी, बऱ्याच १५ ते २० फुट उंच उड्या काही कमानी मधल्या तर काही कापडी चोकटी मधल्या. हायब्रीड पेहेलवानानी पण काही अप्रतिम खेळ दाखवले, तो ही मांडी ठोकून नाना पेह्लावानाच्या उरावर म्हणू म्हणून कर्तब करत होता आणि हास्य कलोळ करत होता. ढोलकी वाला आणि सगळी गावकरी खेळला खूप दाद देत होती आणि  स्वखुशीने पेहाल्वानाला बक्षीस म्हणून कोणी २५१ रुपये कोणी २०१ रुपये कोणी १०१ रुपये कोणी ५१ रुपये कोणी २१ रुपये देत होती. पहेलवान देखील खुश होऊन पैसे देणाऱ्याचे नाव घोषित करत होता.                 
काही क्षनात सर्कशीचे वेगळेच रूप मला अनुभवायला मिळाले. ते असे की ख़ुशी ने पैसे देणाऱ्या गोष्ट गोष्टीने काही वेगळेच वळण घेतले. लोक आता पहेलवानाच्या खेळावर खुश होऊन पैसे न देता आता दुसऱ्याला चुरस दयायची म्हणून त्यांनी एवढे दिले का तर मी एवढे देणार जास्त नाही जन्मला तर काय झाला मी पण देणार अस दिसत होता. जो तो आपल पण नाव घोषीत व्हाव यासाठी प्रयत्न करत होता. ते दृश्य पाहून जरा वाईट खर पण पुढच्याच क्षणी जाणवल की ही तर माणसाची सवयच आहे तो प्रत्येक ठिकाणी स्पर्धाच करायला बघतो.
इतके सगळे होत असताना हि तो पहेलवान सतत हसत आणि हसवत होता. त्याला कुठल्या गोष्टीच काही वाटत नव्हतं तो फक्त आणि फक्त खेळावर लक्ष्य देत होता. प्रत्येकाने केलेली स्तुती तो मोठ्या मनाने स्वीकारत होता, त्याला स्तुती कोणत्या भावनेने केली आहे याची काळजीच नव्हती जणू. तो फक्त धन्यवाद म्हणून पुढचे खेळ करत होता.      
काही वेळाने त्याने शेवटची हनुमान उडी मारली आणि त्याची किती कमाई झाली ते ही घोषित केले आणि पुन्हा हसऱ्या चेहऱ्यानेच संपूर्ण गावाचे आभार मानले आणि त्याच्या तंबू मध्ये निघून गेला. या वेळी पुन्हा मला प्रश्न पडला की हा माणूसच आहे ना, कारण लहान पणा पासून बघत आलोय की कोणीही आपली कमाई इतक्या सहज आणि हसऱ्या चेहऱ्याने सांगत नाही. आहो आता मी हि थोडा फार कमवायला लागलोय तर कोणी विचारला तर सांगतो की कमावतो पोटा पुरत जर ज्यास्तच आग्रह केला तर व्रष्याचा इतक्याच प्याकेज आहे अशी उत्तर देतो. इतका सगळा असून हा कोण एक साधा पेहलवान पण किती हसरा आणि समाधानी राहतो असाच वाटलं.

अश्या प्रकारे तो पेहलवान शिकवून गेला, आयुष्यात काहीही मिळवण्यासाठी जे प्रयत्न आपण करतोना ते ख़ुशी ने आणि हसत करा परीणामांची काळजी न करता. ते म्हणतात ना happiness + hard work = success तस.  

वाचल्या बद्दल आभारी आहे !!!
हसत जगा धन्यवाद !!!
राहुल चांदुरे   
Advertisements

18 Comments

 1. Sujit Rokade says:

  Good. Learning is great. Always.

  Like

 2. Unknown says:

  I like it…….

  Like

 3. thank you so much bro!!!

  Like

 4. thank you so much bro!!!

  Like

 5. thank you so much!!!

  Like

 6. Ankush Raje says:

  Sounds great…
  Lai bhari…

  Like

 7. thank you bhau!!!!

  Like

 8. thank you bhau!!!!

  Like

 9. Ekdam chhan ahe bhau mast…

  Like

 10. Ekdam chhan ahe bhau mast…
  Sahaj pane tumhi pan khup chhan sandesh dila.

  Like

 11. dhanyawad bhau 🙂

  Like

 12. dhanyawad bhau 🙂 tumhi lokach aaht ho jyanchya mule prerna milte 🙂

  Like

 13. Unknown says:

  Mast..!! Keep writing

  Like

 14. thank you so much !!!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: